
मेहकर मतदार संघातील 6 रस्त्यांच्या दुरूस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने 7 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. शिवसेना खासदार प्रतापराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना आमदार संजय रायमुलकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाशी वेळोवेळी संपर्क करून ही तरतूद करून घेतली. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्ते देखभाल व दुरूस्ती अंतर्गत योजनेवर तरतुदीमधून 7 कोटी रुपये मंजूर केले आहेत.
सुलतानपूर, अंत्री देशमुख, मादणी रस्त्यांच्या डोणगाव ते मादणीपर्यंतच्या 5 किलोमीटरच्या दुरुस्तीसाठी 1 कोटी 75 लाख रुपये, मेहकर गणपूर बोराखेडी रस्त्याच्या 6 किलोमीटरच्या दुरुस्तीसाठी 1 कोटी रुपये, सावंगी भगत सावंगी माळी या दीड किलोमीटर रस्त्याच्या दुरूस्तीसाठी 52 लाख रुपये, कळमेश्वर सोनारगव्हाण शेंदला मोळा उमरा आंध्रुड या रस्त्याच्या 9 किलोमीटरच्या दुरूस्तीसाठी 2 कोटी 8 लाख रुपये, सुलतानपूर हिरडव वढव या रस्त्याच्या 13 किलोमीटरच्या दुरुस्तीसाठी 1 कोटी 5 लाख रुपये व जानेफळ लोणीगवळी घाटबोरी जनुना पांगरखेड बेलगाव रस्त्याच्या 42.500 किलोमीटरच्या दुरूस्तीसाठी 60 लाख रुपये अशी तरतुद करण्यात आली आहे.



























































