एस. चोकलिंगम यशदाचे नवे महासंचालक;राज्य सरकारने केल्या सात सनदी अधिकाऱयांच्या बदल्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्य सरकारने सात सनदी अधिकाऱयांच्या बदल्या केल्या आहेत. जमाबंदी आयुक्त व संचालक भूमी अभिलेख पुणे एस. चोकलिंगम यांची नियुक्ती महासंचालक, यशदा पुणे या पदावर करण्यात आली आहे.

श्रावण हर्डीकर महापालिका आयुक्त, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, पिंपरी, पुणे यांची नियुक्ती नोंदणी महानिरीक्षक आणि नियंत्रक मुद्रांक शुल्क, पुणे या पदावर करण्यात आली आहे. तर राजेश पी. पाटील यांची आंतरराज्य प्रतिनियुक्तीने राज्य महापालिका आयुक्त, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका पिंपरी, पुणे या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. शीतल उगले-तेली यांची नियुक्ती संचालक, वस्त्रोद्योग, नागपूर या पदावर बदली झाली आहे.

प्रेरणा देशभ्रतार आयुक्त, अपंग कल्याण, पुणे यांची नियुक्ती जिल्हाधिकारी वर्धा या पदावर करण्यात आली आहे. अनिता पाटील भारतीय वायुसेना उपवनसंरक्षक भूमी अभिलेख, पनवेल यांची नियुक्ती सदस्य सचिव, राज्य महिला आयोग, मुंबई या रिक्त पदावर झाली आहे. एन. के. सुधांशू यांची केंद्रीय प्रतिनियुक्तीवरून राज्य शासनाकडे रुजू झाल्यानंतर जमाबंदी आयुक्त व संचालक भूमी अभिलेख, पुणे या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.