अबब! हिंगोलीत जिल्हा परिषद शाळेमध्ये आढळले ७० साप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । हिंगोली

हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात पांगरा बोखारे गावातील जिल्हा परिषद शाळेच्या किचनमध्ये घोणस जातीचे एक दोन नव्हे तर चक्क ६० ते ७० साप आढळून आले आहेत. शाळेचे मध्यान्न भोजन शिजवण्याच्या किचनमध्ये अचानक एवढे साप पाहून शिक्षकांना घाम फुटला. परंतु घाबरून न जाता त्यांनी सर्पमित्राला पाचारण करुन त्या सापाना पकडले.

मिळालेल्या माहितीनुसार हे सर्व साप घोणस जातीचे असून पकडलेल्या सापांना पकडून जंगलात सोडून जीवदान देण्यात आले. दरम्यान, ग्रामीण भागात साप आढळणे ही फार मोठी गोष्ट नाही, परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणात एकाच ठिकाणी साप आढळून येणे आणि तेही शाळेत त्यामुळे येथील नागरिक आणि विद्यार्थ्यांमध्ये मोठा कुतुहुलाचा विषय बनला आहे. सापांना पकडून जीवनदान दिल्याने ग्रामस्थांच्यावतीने सर्प मित्र विक्की दयाळ यांचा सत्कार करण्यात आला.

पाहा व्हिडीओ :