Ratnagiri News – कर थकविणाऱ्या 71 मालमत्ता सील, रत्नागिरी नगरपरिषदेची कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
रत्नागिरी नगर परिषदेने करवसुलीची मोहीम सुरू केली आहे.कर थकविणाऱ्यांच्या 73 मालमत्ता सील करण्यात आल्या आहेत.कर थकविल्यामुळे 61 जणांचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे.
रत्नागिरी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी वैभव गारवे यांच्या मार्गदर्शनाखाली हि कर वसुली मोहीम सुरू आहे.रत्नागिरी नगर परिषदेचे लक्ष्य 15 कोटी 87 लाख 50 हजार 648 रुपये आहे.त्यापैकी 10 कोटी 31 लाख 13 हजार 61 रूपये कर वसूल झाला आहे.आतापर्यंत 65 टक्के वसुली झाली असून शेवटच्या दहा दिवसांत जोरदार वसुली मोहीम राबवली जाणार आहे.
सुट्टीच्या दिवशीही कर भरता येणार 
रत्नागिरी नगर परिषदेने नागरिकांना कर भरण्यासाठी सुट्टीच्या दिवशीही कार्यालय सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 26,28,29 आणि 31 मार्च रोजी सुट्टीच्या दिवशी कर भरता येणार आहे.