गोव्यात आढळले कोरोनचे 77 रुग्ण, 111 रुग्ण कोरोनामुक्त

505

गोव्यात आज कोरोनाचे 77 रुग्ण आढळले आहेत. आज 111 रुग्ण बरे होऊन घरी गेले असून 7 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

राज्यातील एकूण रुग्णांचा आकडा 1 हजार 761 वर गेला असून त्यातील 936 बरे झाले असून 818 जणांवर उपचार सुरु आहेत. मूरगावचे नगरसेवक पाश्कॉल डिसोझा यांचा कोरोना मुळे मृत्यू झाला असून मृतांचा आकडा 7 वर गेला आहे. डिसोझा हे मांगोर प्रभागाचे नगरसेवक होते. मांगोर हिलचा विषय दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. सध्या मांगोर हिल मध्ये 175 रुग्ण असून मांगोर हिलशी निगडीत 257 रुग्ण असल्याने चिंतेचे वातावरण कायम आहे.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सोमवारी सचिवालयात मांगोर हिलवर वरिष्ठ पातळीवर चर्चा करण्यासाठी बैठक आयोजित केली आहे.बैठकीला मूरगाव मधील चारही आमदार उपस्थित

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आज आपल्या मंत्र्यांना त्यांच्या मतदारसंघात येत असलेल्या तालुक्याची जबाबदारी वाटून दिली आहे. त्याशिवाय अतिरिक्त पाचशे बेडची व्यवस्था करण्या बरोबरच दूसरे कोविड हॉस्पिटल सुरु करण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. पावसाळ्यात कोरोनाचा फैलाव होण्याची शक्यता असल्याने शक्यतो एकमेकांच्या घरात जाणे येणे टाळा,असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या