जालना जिल्ह्यात 54 उमेदवारांची माघार; 79 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

458
election

जालना जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघातील 133 उमेदवारांपैकी 54 उमेदवारांनी माघार घेतली असून 79 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यामध्ये परतूर विधानसभा मतदारसंघामध्ये छाननीअंती वैध 21 उमेदवारांपैकी 7 उमेदवारांनी माघार घेतली असून 14 उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात आहेत. घनसावंगीमध्ये 27 उमेदवारांपैकी 14 उमेदवारांनी माघार घेतली असून 13 उमेदवार आहेत. जालनामध्ये 56 उमेदवारांपैकी 24 उमेदवारांनी माघार घेतली असून 32 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. बदनापुर विधानसभा मतदारसंघात 20 उमेदवारांपैकी 6 उमेदवारांनी माघार घेतली असून 14 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. तर भोकरदन विधानसभा मतदारसंघात 9 उमेदवारांपैकी 3 उमेदवारांनी माघार घेतली असून 6 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या