महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत 798 उमेदवारांचे अर्ज रद्दबातल

653

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. विधानसभा निवडणुकीत राज्यातील 798 उमेदवारांचे अर्ज रद्दबातल ठरवण्यात आले आहेत. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार उमेदवारांनी भरलेल्या अर्जात अनेक त्रुटी आढळल्याने हे अर्ज रद्दबातल ठरवण्यात आले आहेत.

निवडणुकीसाठी आतापर्यंत 4 हजार 739उमेदवारांचे अर्ज वैध ठरवण्यात आले आहेत. महाराष्ट्रात 7 ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख अहे. राज्यात एकाच टप्प्यात निवडनूक पार पडणार आहे. 21 ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. तर 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी आणि निकाल जाहीर केले जातील.

 

आपली प्रतिक्रिया द्या