
कोस्टल रोडवर ‘बेस्ट’चा गारेगार प्रवास सुरू झाल्यानंतर पहिल्याच दिवशी तब्बल 793 प्रवाशांनी अवघ्या सहा रुपयांत गारेगार प्रवास केला. यामुळे बेस्टच्या तिजोरीत पहिल्या दिवशी 4,442 रुपयांचा महसूल जमा झाला.
‘बेस्ट’च्या बसचा कोस्टल रोडवर 12 जुलैपासून प्रवास सुरू झाला आहे. किमान 6 रुपये आणि कमाल 19 रुपये तिकीट दर आहे. बेस्टची नवीन वातानुकूलित बसमार्ग क्र. ए- 78 ही बस एन.सी.पी.ए. (नरीमन पॉइंट) आणि भायखळा स्थानक (प.) मरीन ड्राईव्ह, ‘स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज सागरी किनारा मार्ग’दरम्यान एसी बस प्रवासी सेवेत धावत आहे. सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते रात्री 11 पर्यंत प्रवासी सेवेत एसी बस उपलब्ध करण्यात आली आहे.
ही बस ब्रीच कॅण्डी रुग्णालय, हाजी अली, महालक्ष्मी स्थानक मार्गे नवीन वातानुकूलित बसमार्ग क्र. ए-78 ही बस धावत आहे.