
सामना प्रतिनिधी । कराड
प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय, नागठाणे यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात समाजातील प्रत्येकाचे आयुष्य दाही दिशांनी उजळून काढण्यासाठी आपले आयुष्य वाहून घेणारे थोर समाजसेवक संत गाडगे महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त कराड येथील सदगुरु गाडगे महाराज प्राथमिक विद्यामंदिर आणि सदगुरु गाडगे महाराज माध्यमिक विद्यालयाच्या ८५० विद्यार्थ्यानी संत गाडगे महाराज यांचेच मुखवटे घालून स्वच्छतेची शपथ घेऊन विनम्र अभिवादन केले. डॉ दीपक हारके यांनी विद्यार्थ्याना स्वच्छतेची शपथ दिली.
बी के सुवर्णा यांनी संत गाडगे महाराज यांच्या कार्याची विद्यार्थ्याना माहिती दिली व ध्यानधारणेचा अभ्यास करून घेतला. याची नोंद “ग्लोबल रेकॉर्डस्” मध्ये झाली आहे. “ग्लोबल रेकॉर्ड्स” च्या प्रमाणपत्रासह डॉ बी के दीपक हारके, प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय नागठाणे सेवाकेंद्राच्या संचालिका बी के सुवर्णा, सदगुरु गाडगे महाराज माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक सचिन पवार सर, सौ विद्या मोहिते, सदगुरु गाडगे महाराज प्राथमिक विद्यामंदिर च्या मुख्याध्यापिका सौ सुनीता जाधव, बी के देविदास, बी के अंकिता. डॉ दीपक हारके यांचा हा ८७ वा विश्वविक्रम आहे.






























































