
विधानमंडळ समित्यांच्या दौऱयादरम्यान सदस्यांचे आचरण कसे असावे याबाबत विचारविनिमय करण्यासाठी संयुक्त समिती गठीत करण्यात आली आहे. त्या समितीमध्ये शिवसेनेचे विधानसभा मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांच्यासह 9 सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे.
समितीच्या प्रमुखपदी विधानसभेतील भाजप आमदार चैनसुख संचेती यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर समितीच्या सदस्यांमध्ये सुनील प्रभू यांच्यासह भाजपचे सुधीर मुनगंटीवार, विजयकुमार देशमुख, एकनाथ शिंदे गटाचे दीपक केसरकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप वळसे-पाटील, काँग्रेसचे अमिन पटेल, विधान परिषदेतील भाजप आमदार अमरीश पटेल आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे रामराजे नाईक-निंबाळकर यांचा समावेश आहे.






























































