वादळानंतर रत्नागिरी जिल्हा सावरतोय,  93.44 मिमी पावसाची नोंद

429

निसर्ग वादळानंतर रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात खासगी आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले. शासकीय यंत्रणेकडून पंचनामे सुरू असून त्यानंतरच नुकसानीचा आकडा लवकरच कळेल. गेल्या 24 तासात सरासरी 93.44 मिमी तर एकूण 841 मिमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची नोंद लांजा तालुक्यात 131 मिमी झाली आहे.

जिल्ह्यात गेल्या 24 तासात अन्य ठिकाणी पडलेल्या पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. मंडणगड 130 मिमी, दापोली 125 मिमी, खेड 76 मिमी, गुहागर 77 मिमी, चिपळूण 102 मिमी, संगमेश्वर 73 मिमी, रत्नागिरी 40 मिमी, राजापूर 87 मिमी पावसाची नोंद झाली आहे. मंडणगड तालुक्यात मौजे मंडणगड येथे उपअभियंता यांच्या निवासस्थान व 6 शेडच्या छतावरील पत्रे वादळीवाऱ्यात उडून अंशत: नुकसान झाले जिवीत हानी नाही.

मौजे पाजपंढरी येथे 2 व्यक्ती वादळीवाऱ्यामध्ये जखमी झाले. मौजे आगरवायंगणी येथील विरेंद्र येलगे घराच्या छतावरील पत्रे वादळीवाऱ्याने उडून अंशत: नुकसान झाले जिवीत हानी नाही.  एका बैलाचा मृत्यू झाला आहे.  मौजे आंजर्ले येथे राजेश बोरकर यांच्या एका गायीचा मृत्यू झाला आहे. मौजे आंजर्ले येथे मंगेश महाडीक यांच्या वादळीवाऱ्याने 48 कोंबड्या मेल्या झाल्या आहेत. मौजे आवाशी येथे साधारण 5 ते 6 घराच्या छतावरील पत्रे वादळीवाऱ्याने उडून अंशत: जिवीत हानी झालेली नाही नाही.

आपली प्रतिक्रिया द्या