गोव्यात आढळले कोरोनाचे 95  रुग्ण, एकूण रुग्णसंख्या 1 हजार 482 वर

569

गोव्यात आज कोरोनाचे विक्रमी 95 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील एकूण रुग्णांची संख्या 1 हजार 428 वर पोहोचली आहे.

राज्यात आतापर्यंत 64 रुग्ण बरे होऊन घरी गेले असले तरी रुग्णांचा आकडा वाढतच चालला आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या ताळगाव येथील रुग्णावर आज मडगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच बरोबर सासष्टि मधील कोरोना बाधित भाजप आमदाराच्या कुटुंबीयांना देखील कोरोनाची लागण झाल्याचे चाचणीत आढळून आले आहे.

गोव्यात आतापर्यंत 1 हजार 482 रुग्ण आढळून आले असून त्यातील 744 सक्रिय आहेत. 734 जण बरे झाले असून आता पर्यंत चौघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजी माजी आमदार देखील कोरोनाचे रुग्ण बनू लागले आहेत. वास्को मधील मांगोर हिल मधील रुग्णांची संख्या 240 असून मांगोर हिलशी निगडीत रुग्ण संख्या 221 वर पोचली आहे. कोरोनाचा सामुदायिक प्रसार वेगाने होऊ लागला आहे. फोंडा पोलिस स्थानकातील कर्मचाऱ्यांना कोरोनाने ग्रासले आहे.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या मतदारसंघातील रुग्णांचा आकडा 34 झाला आहे. कामराभाट-करंजळेत फक्त दोनच रुग्ण आढळल्याने पणजीचा धोका थोडा कमी झाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या