
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
जम्मू कश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला पुन्हा एकदा बरळले आहेत. त्यांनी पाकिस्तानचा क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीच्या फुत्काराला साथ दिली आहे.
शाहिद आफ्रिदीने कश्मीरबाबत अकलेचे तारे तोडले होते. त्यावर प्रतिक्रिया देत असताना अब्दुल्ला यांनी गरळ ओकलीय. ‘कश्मीरमध्ये होणाऱ्या हत्यांची प्रत्येकाने निर्भत्सना करणे आवश्यक आहे. सर्व देश याची निर्भत्सना करत आहेत. या हत्या कोणत्याही परिस्थितीमध्ये थांबल्या पाहिजेत. ते लोक ( हिंदुस्थानी जवान) निरापराधांना मारत आहेत. त्यांच्यामध्ये आणि दहशतवाद्यांमध्ये काही फरक नाही.
Everybody has condemned the killings in Kashmir. Every nation is condemning the killing, the killing must stop: Farooq Abdullah, former J&K CM on Shahid Afridi’s tweet pic.twitter.com/hSzKvkhHlx
— ANI (@ANI) April 4, 2018
बेताल वक्तव्य करण्याची अब्दुल्ला यांची ही पहिलीच वेळ नाही. मागच्या वर्षी अब्दुल्लांनी कश्मीरप्रश्नी पाकिस्तानची वकिली केली होती. ‘पाकिस्तानकडे अणूबॉम्ब असल्याने हिंदुस्थान शेजार्या देशाशी युद्ध करु शकत नाही. या प्रकरणात मित्रांची मदत घ्यावी’असे सांगत त्यांनी कश्मीरप्रश्नी तिसऱ्या पक्षाला सहभागी करुन घेण्याची मागणी केली होती.
काय आहे प्रकरण?
हिंदुस्थानच्या लष्कराने रविवारी जम्मू कश्मीरमध्ये केलेल्या कारवाईत १३ दहशतवाद्यांचा खात्मा केला. दहशतवादाचे नंदनवन असलेल्या पाकिस्तानाचा खेळाडू आफ्रिदीला यामुळे कमालीचे दु:ख झाले. त्यानंतर ‘हिंदुस्थान अधिकृत कश्मीर ( जम्मू-कश्मीर)मधील परिस्थितीही अस्वस्थ करणारी आणि चिंताजनक आहे. येथे स्वयंनिर्णय आणि स्वातंत्र्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातोय. संयुक्त राष्ट्र आणि अन्य आंतरराष्ट्रीय संघटना कुठे आहेत? हा खूनी संघर्ष रोखण्यासाठी ते काही करत नाहीत?’ असे विषारी फुत्कार करणारे ट्वीट आफ्रिदीने केले होते.
























































