
सामना ऑनलाईन । मुंबई
मुंबई सीएसएमटीवरून सुटणाऱ्या सोलापूर एक्सप्रेसच्या ३ डब्यांना आग लागल्याची घटना घडली आहे. लांबपल्ल्याच्या गाड्यांच्या यार्डात उभ्या असलेल्या गाडीच्या एका डब्यात अचानक आग लागली आणि काही वेळातच संपूर्ण डबा आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली. मात्र या आगीचे कारण अद्याप समजलेले नाही.
आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ४ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्यात त्यांना यश आलं आहे. या घटनेमुळे लांबपल्ल्याच्या गाड्यांचे वेळापत्रक बिघडण्याची शक्यता आहे.
Mumbai: Fire broke out in a coach of a train parked at Chhatrapati Shivaji Terminus (CST) railway yard, fire being doused pic.twitter.com/W7iMvgxRf5
— ANI (@ANI) May 29, 2018
























































