
सामना प्रतिनिधी । नांदेड
नांदेड शहरात सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पावसाने हजेरी लावली. शुक्रवारी रात्री १२.३० ते ३ वाजेपर्यंत मुसळधार पाऊस कोसळला. सतत दोन दिवस पाऊस पडल्याने नांदेडकराना उकड्यापासून दिलासा मिळाला आहे. मात्र पहिल्याच पावसात शहरात २ फुटापर्यंत पाणी साचल्याने नाले सफाई केल्याचा महापालिकेचा दावा फोल ठरला आहे.
नांदेड शहरातील अर्धापुर मालेगाव, कहाळा, मारतळा, सोनखेड, लोहा, हिमायतनगर, तामसा या भागात पाऊस पडून जवळपास २ फूट पाणी साचले होते. पाऊसानंतर नाल्यांमधील सर्व घाण पाणी रस्त्यावर जमा झाली आहे. गोदावरी जल शुद्धीकरण योजनेचे काम युद्ध पातळीवर चालू असल्याच्या बड्या बड्या बाता करणाऱ्या महापालिकेच्या कामाचे पितळ या पावसामुळे उघडे पडले. ६ नाल्याचे पाणी थेट गोदावरी नदीपात्रात मिसळत आहे हे काम वेळेत पूर्ण झाले असते तर ही भयावह परिस्थती निर्माण झाली नसती.
























































