जेटच्या १५८ प्रवाशांचा खोळंबा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

अहमदाबाद जेट विमानातील तांत्रिक बिघाडामुळे जेटचे १५८ प्रवासी मुंबई विमानतळावरच अडकून पडले. जेटच्या कर्मचाऱयाने सुरुवातीला अहमदाबाद विमानतळ बंद असल्याचे कारण सांगत विमानाला उशीर होणार असल्याचे सांगितले. मात्र, नंतर जेटच्या विमानात तांत्रिक बिघाड असल्याचे जेट प्रशासनाने सांगितले. अहमदाबाद विमानतळावरून सकाळी १० ते दुपारी ३दरम्यान विमानतळ बंद राहील, असे सांगण्यात आले होते. मात्र, नंतर जेटच्या विमानाला उतरण्याची परवानगी देण्यात आली. पण याच दरम्यान विमानात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे विमानाला उशीर झाला आणि १५८ प्रवासी मुंबई विमानतळावरच अडकून पडल्याचे जेट प्रशासनाने मान्य केले.