जागतिक सायकल दिनानिमित्त निघाली सायकल रॅली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

संपत्ती आरोग्याची हमी देऊ शकत नाही. पण सुदृढ आरोग्य असेल तर तुम्ही प्रचंड मेहनतीने पैसा कमावू शकता, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी केले. सायकल हे अत्यंत स्वस्त, टिकाऊ आणि अतिशय साधे वाहन असल्याचं सांगतानाच जास्तीत जास्त लोकांनी सायकल चालवायला हवी. त्यासाठी सर्वच शहरांनी पुढाकार घ्यायला हवा असेही उपराष्ट्रपतींनी सांगितले.

नवी दिल्लीत जागतिक सायकल दिनानिमित्त आयोजित सायकल रॅलीला झेंडा दाखवल्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. नवी दिल्लीच्या कनॉट प्लेस या ठिकाणी या सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. पर्यावरणमंत्री डॉ. हर्ष वर्धन, केंद्रीय संसदीय कामकाज राज्यमंत्री विजय गोयल यांच्यासह अनेक प्रसिद्ध व्यक्तींनी या सायकल रॅलीत सहभाग घेतला. जवळपास पाच हजार सायकलस्वारांनी आठ किलोमीटरच्या या रॅलीत मोठय़ा हिरिरीने सहभाग घेतला.