‘सरकारची ‘नियत’ नाही, आता शेतकऱ्यांनी टोकाची भूमिका घ्यावी’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

देशभर सुरू असलेल्या शेतकरी संपावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. शेतकऱ्यांना सरकारने अनेक आश्वासने दिली, मात्र ती आश्वासने पूर्ण करण्यासाठी कोणत्याही उपाययोजना केल्या नाहीत. यावरून हे दिसून येत की शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याची सरकारची ‘नियत’ नसल्याने आता शेतकऱ्यांनी टोकाची भूमिका घ्यावी असं आवाहन शरद पवारांनी केलं. याशिवाय शेतकरी म्हणून आपला शेतकरी संपाला पूर्ण पाठिंबा असल्याचे म्हटले आहे.

१ जूनपासून देशभरातील शेतकरी संपावर असून आज संपाचा चौथा दिवस आहे. गेल्या वर्षीही शेतकरी संपावर गेले होते. त्यावेळी सरकारने शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वसनांची पूर्तता न केल्याच्या निषेधार्थ व इतर मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी १० जूनपर्यंत पुन्हा संपावर गेले आहेत.

‘शेतकरी म्हणून या आंदोलनाला माझी साथ आहे. शेतकरी बांधवांना विनंती आहे की दूध रस्त्यावर ओतणे, भाजीपाला रस्त्यावर फेकणे हा प्रकार टाळता आला तर टाळावा. गरजू वर्गात हा माल वाटावा याने तुम्ही कष्टाने पिकवलेल्या मालाची नासाडी होणार नाही आणि सरकारला तुमचा आक्रोश या माध्यमातून दिसेल’, असंही शरद पवार म्हणाले.