दोन सख्ख्या भावंडांचा नाव उलटल्याने मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नागपूर

आल्लापल्ली येथील रहीवासी असलेले चेतन संतोष केळझरकर (वय २५) व सुरज संतोष केळझरकर (वय १७) या दोन सख्ख्या भावंडाचा अहेरी तालुक्यातील टिकेपल्ली नदी घाटावर नाव उलटल्याने मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी ५ च्या दरम्यान घडली आहे.

चेतन संतोष केळझरकरचा मंगळवारी जन्मदिवस होता. त्याप्रित्यर्थ मित्रांसोबत टिकेपल्ली येथील नदीघाटावर पार्टी करण्यासाठी गेले होते. यात चेतन केळझळकरचा लहान भाऊ सुद्धा गेला होता. दरम्यान, मौज मस्तीत करीत सारेजण नदीमध्ये असलेल्या नावेत बसले. नाव काही अंतरावर गेल्यानंतर असंतुलित झाल्याने नाव उलटली व संतोष व सुरज  बुडाले.अद्यापही त्यांचे मृतदेह सापडलेले नाहीत. याबाबत अहेरी पोलीस घटनेचा तपास करत आहे.