दहावीचा निकाल येथे पाहा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

निकाल पाहण्यासाठी पुढील फोटोवर दुपारी १ वाजता क्लिक करा

result-icse

सामना प्रतिनिधी । मुंबई

राज्यातील दहावीचा निकाल राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांनी आज पत्रकार परिषदेत जाहीर केला. राज्यात दहावीचा निकाल ८९.४१ टक्के इतका लागला असून ८७.२७ टक्के विद्यार्थी तर ९१.९७ विद्यार्थिनी उत्तिर्ण झाल्या आहेत. त्यामुळे यंदाही मुलीच मुलांपेक्षा सरस ठरल्या आहेत. तसेच विभागनिहाय विचार करता कोकण विभागाच सर्वोत्तम ठरला असून येथील ९६ टक्के परीक्षार्थी उत्तिर्ण झाले आहेत.

निकालाची विभागीय टक्केवारी…

१) कोकण : ९६.०० टक्के
२) कोल्हापूर : ९३.८८ टक्के
३) पुणे : ९२.०८ टक्के
४) मुंबई : ९०.४१ टक्के
५) औरंगाबाद : ८८.८१ टक्के
६) नाशिक : ८७.४२ टक्के
७) अमरावती : ८६.४९ टक्के
८) लातूर : ८६.३० टक्के
९) नागपूर : ८५.९७ टक्के

दहावीचा ऑनलाइन निकाल आज दुपारी १ वाजता जाहीर होणार आहे. विद्यार्थ्यांना वेबसाइटवर सर्व विषयांचे गुण उपलब्ध होतील. तसेच सदर माहितीची प्रिंटआऊटही घेता येईल, असे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे प्रभारी सचिव डॉ. अशोक भोसले यांनी स्पष्ट केले.

येथे पहा निकाल….

www.mahresult.nic.in
www.sscresult.mkcl.org
www.maharashtraeducation. com
BSNL युजर्स ५६७७ या क्रमांकावर MHSSC (sapce) (seat no) असा मेसेज करून निकाल जाणून घेऊ शकता.

– ९ ते १८ जून या कालावधीत गुणपडताळणी व उत्तरपत्रिकेच्या छायाप्रतीसाठी अर्ज करता येईल
– उत्तरपत्रिकेच्या पुनर्मूल्यांकनासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य आहे. छायाप्रत मिळाल्याच्या दुसऱया दिवसापासून कार्यालयीन वेळेत हा अर्ज करता येईल.
– सर्व विषय घेऊन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना श्रेणीसुधार योजनेंतर्गत पुन्हा परीक्षेला बसण्याची संधी मिळणार आहे. जुलै-ऑगस्ट २०१८ आणि मार्च २०१९ या दोनच संधी त्यासाठी असणार आहेत.