
सामना प्रतिनिधी । संभाजीनगर
मराठवाड्यात सर्वप्रथम स्थापन झालेल्या शिवसेना संभाजीनगर शाखेचा ३३ वा वर्धापनदिन उद्या शुक्रवार, ८ जून रोजी आहे. या निमित्ताने सिडकोतील जगद्गुरू संत तुकाराम महाराज नाट्य मंदिरात जिल्ह्यातील शिवसैनिकांसह शाखाप्रमुख व सरपंच यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी शिवसेना नेते, केंद्रीय मंत्री अनंत गिते, खासदार चंद्रकांत खैरे, सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे, माजी खासदार आनंदराव आडसूळ यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे.
शुक्रवार, ८ जून रोजी सकाळी १० वाजता सुरू होणाऱ्या या मेळाव्यास शिवसेना नेते तथा केंद्रीयमंत्री अनंत गिते, खासदार चंद्रकांत खैरे, सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे, खासदार आनंदराव आडसूळ, जिल्ह्याचे पालकमंत्री तथा आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत, राज्यमंत्री अर्जुन खोतकर, संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर, महिला आघाडीच्या संपर्कप्रमुख अॅड. मनीषा कायंदे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. यावेळी महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल, आमदार संजय शिरसाट, संदिपान भुमरे, हर्षवर्धन जाधव, महापौर नंदकुमार घोडेले, जिल्हा परिषद अध्यक्ष अॅड. देवयानी डोणगावकर, माजी आमदार अण्णासाहेब माने, आर.एम. वाणी, महिला आघाडी संपर्क संघटक कला ओझा, सहसंपर्क संघटक सुनीता आऊलवार यांचीही उपस्थिती राहणार आहे.
यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, शहरप्रमुख, उपतालुकाप्रमुख, विभागप्रमुख, उपविभागप्रमुख, शाखाप्रमुख, जि.प., पं.स., मनपा व न.प. सदस्य, शाखा संघटक, महिला आघाडी, युवा सेना व अन्य अंगीकृत संघटना, सहकारी संस्थेचे संचालक यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, नरेंद्र त्रिवेदी, जिल्हा संघटक आनंदीताई अन्नदाते, रंजना कुलकर्णी, उपजिल्हाप्रमुख जयवंत ओक, अनिल पोलकर, संतोष जेजूरकर, राजेंद्र राठोड, राजेंद्र आदमाने, गणेश चोपडे, लक्ष्मण सांगळे, कृष्णा डोणगावकर, बाबासाहेब जगताप, संतोष काळवणे, अशोक शिंदे, अवचित वळवळे, राजेंद्र राठोड, विनोद बोंबले, रघुनाथ चव्हाण, तालुकाप्रमुख रमेश बोरणार, सुभाष कानडे, बप्पा दळवी, दिनेश मुथा, राजू वरकड, केतन काजे, दिलीप मचे, किशोर अग्रवाल, राजेंद्र ठोंबरे, जिजा कोरडे, अण्णा लबडे, कृष्णा पवार, शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, विजय वाघचौरे, विश्वनाथ स्वामी, बाबासाहेब डांगे यांनी केले आहे.
































































