‘ तो’ मध्यरात्री आला आणि सगळ्यांना उठवून कामाला लागला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, मुंबई

गेले अनेक दिवस त्याच्या येण्याची चर्चा सुरू होती, तो इथे अधूनमधून येतही होता मात्र तो लोकांना जसा अपेक्षित होता तसा दिसत नव्हता, त्यामुळे मुंबईकर भयंकर अस्वस्थ झाले होते. मात्र शनिवारी पहाटे तो आला, धूमधडाक्यात त्याचं आगमन झालं. अनेक जण झोपेतून दचकून जागे झाले. कानठळ्या बसवणाऱ्या आणि ह्रदयाचा थरकप उडवणाऱ्या विजांचा कडकडाटात मान्सून मुंबईत पोहोचला.

गोव्यात दोन दिवसांपूर्वी मान्सूनचं आगमन झालं होतं. त्यापूर्वी मुंबईमध्ये सलग दोन दिवस संध्याकाळी पाऊस पडला होता, मात्र तो मान्सूनपूर्व पाऊस होता असं तज्ञांचं म्हणणं होतं. त्यामुळे खरा पाऊस केव्हा येणार याची मुंबईकरांना भयंकर उत्सुकता होती. शनिवारी पहाटे ही उत्सुकता संपली. शनिवार आणि रविवार हे दोन दिवस चांगला पाऊस पडण्याची शक्यता असल्याने मुंबईकरांनी हा विकएंड पावसासोबत साजरा करण्याचे प्लॅन ठरवले आहेत.