
उदय जोशी। बीड
एसटी कर्मचाऱ्यांचा संप चिघळविण्यासाठी बीड शहरात काही समाजकंटकांनी शिवशाही बसची तोडफोड केली आहे. जे कर्मचारी संपात सहभागी न होता ड्युटीवर रुजू झाले आहेत त्यांना रोखण्यासाठी ही तोडफोड केल्याचे बोलले जात आहे. माजलगाव आगाराची बीड -माजलगाव या शिवशाही बसची तोडफोड करण्यात आली आहे.
एस टी कर्मचाऱयांनी आपल्या मागण्यांसाठी पुकारलेल्या कर्मचाऱ्यांच्या संपाला बीडमध्ये संमिश्र प्रतिसाद मिळत आहे , संपात सहभागी असणाऱ्या बीड जिल्ह्यातील १२१ वाहक -चालक कर्मचाऱ्यांना रात्री निलंबित करण्यात आले . त्यामुळे एसटी संघटनेचे पदाधिकारी बिथरले आहेत. याच दरम्यान एसटीची वाहतूक पूर्णपणे रोखण्यासाठी संपाला हिंसक वळण दिले जात आहे. बीडहून माजलगावकडे जाणारी शिवशाही बस शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात फोडण्यात आली या मुळे शिवशाही बस तूर्त थांबवण्यात आल्या आहेत


























































