
सामना ऑनलाईन । नगर
श्री शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांच्या ‘संकल्प सूवर्ण सिंहासनाचा जागर हिंदुत्वाचा’ या उपक्रमांतर्गत नगरमधील पटेल मंगल कार्यालयात सभेला सुरुवात. या सभेला आरपीआय व इतर संघटनांचा विरोध वाढला आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
पाहा LIVE अपडेट:
- हिंदुत्वावर मते मागून केंद्र व राज्यात सरकार स्थापन झाली असली तरी त्यांच्या झेंड्यामध्ये इस्लामिक पाचर असलेला रंग आहे. त्यामुळे त्यांच्या मदतीवर आम्ही थुंकणार देखील नाहीत – भिडे गुरुजी
- सरकार आणि झेंडे यांना सध्या इस्लामिक पाचर मारलीय – भिडे गुरुजी
- सिंहासनासाठी प्रत्येक तालुक्यात दोन हजार धारकरींनी निधी गोळा करायचा आहे. सरकारकडे यासाठी निधी मागणार नाही आणि देऊ केला तरी थुंकणारही नाही.
- धारकऱ्यांच्या हातात तलवारी असणे गरजेचे आहे. पण लोकशाही वाचवण्याचा टाहो फुटेल त्यामुळे सध्या काठ्या घेऊन धारकरी रायगडावर जातील
- पांडुरंग हा केवळ महाराजांमुळं बसलाय.
- महाराजांनी अफजलखानाचा वध केल्यानंच मुस्लिमांचा नंगानाच थांबला, नाहीतर महाराष्ट्रातील जनतेवर देखील अत्याचार झाले असते.
- मुस्लिमांनी देशातील सर्व मंदिरं उध्वस्त केली. महाराष्ट्रातील मंदीरं वाचली आहेत ती फक्त शिवाजी महाराजांमुळे
- रायगडावर खडा पहारा देण्यासाठी दररोज दोन हजार धारकरी रायगडावर जाण्यास तयार
- सुवर्ण सिहांसन रक्षणासाठी हिंदवी स्वराज्य खडा पहारा तुकडी तयार केली जाणार असून त्यात रोज दोन हजार धारकरी कार्यरत राहणार आहेत
- भिडे गुरुजींनी नगरला अंबिकानगर असे नाव जाहीर केलं
- भिडे गुरुजींच्या विरोधात घोषणा
- सभेच्या ठिकाणी आंबेडकरी संघटनांच्या कार्यकर्त्यांचा मोर्चा
- आंबेडकरी संघटनांचा भिडे गुरुजींच्या सभेला विरोध

- रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचे १२८४ किलोचे सोन्याचे सिंहासन उभारणार, येत्या सव्वा वर्षात सिंहासनाचे काम पूर्ण करणार, भिडे गुरुजींची घोषणा
- चौदाव्या वर्षी हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली. त्यानंतर जवळपास छत्तीस वर्ष ते लढले, २८९ लढाया केल्या. प्रत्येक लढाईत मृत्यूचा सामना केला. तो फक्त आपल्या रयतेसाठी
- रामायण, महाभारत आणि मराठ्यांच्या इतिहास वाचला पाहिजे

- सुर्याचं सृष्टीचं नातं तसं महाराजांचं आणि आपलं नातं आहे
- छञपती नसते तर भारत हा हिंदुस्थान नसता
- हिंदू समाजात परस्परवाद हे धोकादायक आहे – भिडे गुरुजी
- महाराजांना हिंदुंचं राज्य हवं होतं. हिंदू समाजाने कसं जगलं पाहीजे हे महाराजांनी शिकवलं
- ‘हिंदवी’ या शब्दाचा अर्थ शिवाजी महाराजांनी शिकवला. महाराजांना हिंदवी स्वराज्य निर्माण करायचं होतं
- भिडे गुरुजींच्या भाषणाला सुरुवात
- शिवप्रतिष्ठानच्या वतीने आयोजित केलेल्या सभेसाठी संभाजी भिडे गुरुजी सभे ठिकाणी दाखल

- सभास्थळी दोन एसआरपीच्या तुकड्या, सहा आरसीपीच्या तुकड्या, चार पोलिस उपअधिक्षक, सहा ते सात पोलिस निरीक्षक, सोळा सहायक पोलिस निरीक्षक व दोनशे पोलिस कर्मचारी यांचा बंदोबस्त




























































