ब्लँकेटमधून परदेशी चलनाची तस्करी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑमलाईन । मुंबई

ब्लँकेटमध्ये लाखो रुपये किमतीचे परदेशी चलन लपवून त्याची तस्करी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या सैफुद्दीन कुलाथिल या प्रवाशाला मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर रंगेहाथ पकडण्यात आले. कस्टमच्या अधिकाऱयांनी त्या प्रवाशाकडून परदेशी चलन जप्त केले असून त्याची हिंदुस्थानी किंमत ७५ लाख ८५ हजार इतकी आहे. सैफुद्दीन दुबईला जाण्यासाठी तो विमानतळावर आला होता. कस्टमच्या हवाई गुप्तचर विभागाच्या पथकाने त्याच्या बॅगेची तपासणी केली असता हा प्रकार उघडकीस आला. सैफुद्दीनने बॅगेत एक ब्लँकेट ठेवले होते. त्यामध्ये त्याने लाखो रुपयांचे परदेशी चलन लपवून ठेवले होते. अशी माहीती उपायुक्त प्रशांत कुमार यांनी दिली.

अंतर्वस्त्रातून सोन्याची तस्करी
आदिम अबाबा येथून आलेल्या राबिया मोहम्मद या महिलेल्या सोन्याची तस्करी करताना रंगेहाथ पकडण्यात आले. राबिया हिने अंतर्वस्त्रात सोन्याची दोन बिस्किटे लपवून ठेवली होती. १९ लाख ९० हजार इतक्या किमतीची ही सोन्याची बिस्किटे आहेत.