बेपत्ता तरुणाचा मृतदेह नदीपात्रात सापडला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। संगमेश्वर

संगमेश्‍वर तालुक्यातील मुचरी मधलीवाडी येथून दोन दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या तरुणाचा मृतदेह गडनदी पाण्याच्या पात्रात सापडला आहे. रोहिदास राजाराम मोरे (३३) असे या तरुणाचे नाव आहे.

रोहिदास हा १० जूनला दुपारी घरातून बाहेर पडला होता. मात्र तो घरी न आल्याने त्याची शोधा शोध सुरु होती. तेथील ग्रामस्थही त्याचा शोध घेत होते. अखेर रोहिदासचा मृतदेह गडनदीच्या पात्रात सापडला. दरम्यान, संगमेश्‍वर पोलिसांनी या मृत्यूची नोंद केली आहे.