
सामना ऑनलाईन । बंगळुरू
हिंदुस्थान आणि अफगाणिस्तान यांच्यात ऐतिहासिक कसोटी सामना बंगळुरूच्या चिन्नास्वामी मैदानावर खेळला जात आहे. हिंदुस्थानने नाणेफेक जिंकून फंलदाजी करण्याचा निर्णय घेताला आहे. त्यामुळे अफगाणिस्तानच्या गोलंदाजांचा कस लागणार आहे.
अफगाणिस्ताना संघ या सामन्यासह कसोटीमध्ये पदार्पण करत आहे. आतापर्यंत अफगाणिस्तानचा क्रिकेट संघ झटपट क्रिकेटसाठी ओळखला जात होता. पण आजपासून अफागाणिस्ताच्या संघाला आंतराष्ट्रीय स्तरावर१२ वा कसोटी संघ म्हणून मान्याता मिळाली.
या सामन्यासाठी हिंदुस्थानच्या संघामध्ये बदल करण्यात आला असून शिखर धवन व मुरली विजय हे डावाची सुरुवात करतील. लोकेश राहुलला मिडल आर्डरमध्ये संधी देण्यात आली असून यष्टीरक्षक म्हणून दिनेश कार्तिककडे जबाबदारी देण्यात आली आहे.
दरम्यान, अफगाणिस्तानच्या कसोटी पदार्पण सामन्या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरून त्यांना शुभेच्छा दिल्या आहे.























































