मुलगी झाली हो!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संजीवनी धुरी-जाधव,[email protected]

राज्यात पुण्यासह १८ जिह्यांमध्ये मुलींच्या जन्माचे स्वागत झाले आहे. त्यामुळे एक हजार मुलांमागे सर्वाधिक मुलींची संख्या असणाऱया राज्यातील एकूण शहरांमध्ये पुण्याने आघाडी घेतली आहे. यानिमित्ताने पुण्याच्या नोबेल रुग्णालयाचे डॉ. दिलीप माने यांच्याशी केलेली बातचीत.

स्त्रीभ्रूण हत्या रोखणे, मुलींना शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणे,  त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे याबाबत समाजामध्ये आता जागृती वाढली आहे. मुलगी झाली म्हणून दुःख करत बसणाऱयांचे प्रमाणही बरेच कमी झाले आहे. ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या सरकारी मोहिमेमुळे पालकही आता मुलींविषयी चांगला आणि सामंजस्याने विचार करू लागले आहेत. याचा थेट परिणाम मुलींच्या जन्माच्या प्रमाणावर झाला आहे, असे नोबेल रुग्णालयाचे डॉ. दिलीप माने सांगतात.

याबाबत बोलताना डॉ. माने म्हणाले की, मुलगी झाली की अजूनही अनेकांना दुःख होतं. कारण घराण्याला वंशाचा दिवा मिळत नाही अशी अनेकांची मानसिकता असते. पण हीच मानसिकता आता बदलतेय. आमच्याकडून नेहमीच पालकांना मार्गदर्शन केले जाते. मुलगा मुलगी दोघेही समान आहेत. मुलगाच हवा या लोकांच्या मानसिकतेमुळे मुलींच्या जन्माने प्रमाण कमी झाले होते आणि स्त्री भ्रूण हत्या वाढल्या होत्या. अशावेळी आपण खारीचा वाटा घेऊन यासाठी काहीतरी करायला हवे असे वाटले आणि आम्ही  नोबेल रुग्णालयात ‘मुली वाचवा, देश वाचवा’ अशी अनोखी चळवळच सुरु केली. आमच्या प्रमाणेच आज अनेक खाजगी रुग्णालये अशा प्रकारचे उपक्रम राबवून मुलींच्या जन्माचे स्वागत करत असल्याचे डॉ. माने सांगतात.

एवढेच नाही तर मुलगी जन्माला आली तर बिलामध्ये ६० टक्के सवलत त्याबरोबरच मुलगी वर्षाची होईपर्यंत तिची मोफत तपासणी आणि त्याबरोबरच वैद्यकीय सल्ला दिला जातो. १८ कर्षांची होईपर्यंत त्या मुलीला सर्व प्रकारच्या शुल्कामध्ये २० टक्के सूट देण्यात येते. असे

आम्ही मुलींच्या जन्माचे स्वागत करत असल्याचे डॉ. माने अभिमानाने सांगतात. येथे मुलींच्या जन्माचे केक कापून स्वागत केले जाते,असेही डॉ. माने म्हणाले.

पुणे तेथे उणे नाहीच…

पुण्यात२०१६ मध्ये मुलींचे प्रमाण ८४५ एकढे होते; तर २०१७ मध्ये हे प्रमाण ६३ अंकांनी काढल्याने ते ९०८ पर्यंत पोहोचले. यामुळे महाराष्ट्रात एक हजार मुलांच्या जन्मामागे मुलींचे प्रमाण पुण्यात सर्वाधिक ठरले. पुण्याच्या पाठोपाठ गडचिरोलीने ५५ अंकांनी बाजी मारली आहे. त्यानंतर बुलडाणा ४० अंकांनी, जालना ३९, धाराशीव ३०, रायगड २७, सिंधुदुर्ग २६, गोंदिया २३, लातूर २० आणि सातारा जिह्यात १० अंकांनी मुलींचे प्रमाण काढल्याचे आकडेवारी सांगते. त्याशिकाय ठाणे, धुळे, नंदुरबार, नगर, नांदेड, अमराकती या जिह्यांमध्ये एक ते १२ अंकापर्यंत मुलींच्या जन्माचे प्रमाण काढले आहे.