
सामना ऑनलाईन । महेंद्रगड
जगभरात काही विचित्र माणसं पाहायला मिळतात. ज्यांचे किस्से ऐकल्यानंतर आश्चर्याचा धक्काच बसतो. साधारण: सर्व सामान्य माणसं उन्हाळ्यात गरमीमुळे हैराण होतात. तर हिवाळ्यात थंडीच्या दिवसात त्यांना हुडहुडी भरते. मात्र हरयाणामध्ये असा एक अजब माणूस समोर आला आहे ज्याला उन्हाळ्यात थंडी वाजते तर हिवाळ्यात गरम होतं.
Mahendragarh: Man, named Santram, says he feels cold during summers & hot during winters, adds that he uses blankets during hot summer months & eats ice in winters. Locals in his village Deroli say he has been doing this since childhood. #Haryana pic.twitter.com/MpzttaUOsu
— ANI (@ANI) June 14, 2018
संतराम असं या व्यक्तीचं नाव असून ते हरयाणातील महेंद्रगडचे रहिवासी आहेत. संतराम यांना उन्हाळ्यात थंडी वाजत असल्याने ते पांघरुण घेऊन झोपतात. तर भर दुपारी प्रचंड गरम होत असताना शेकोटी करून बसतात. तसेच गावकऱ्यांनी संतराम हे हिवाळ्यात आईसस्क्रिम खातात. तर कधी कधी खूप थंडी असताना देखील पहाटे तलावात जाऊन आंघोळ करत असल्याच सांगितलं.
संतराम यांचा हा त्रास काही नवा नसून त्यांना लहानपणापासूनच अशा स्वरुपाचा आजार असल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली. तसेच हा आजार समजण्यासाठी त्यांच्या अनेक वैद्यकीय चाचण्याही करण्यात आल्या. मात्र त्यातून काहीच स्पष्ट झाले नाही. त्यामुळेच डॉक्टरांनी संतराम यांच्यासोबत जे काही होत आहे ते निसर्गाची देण असल्याचं म्हटलं आहे.























































