
जम्मू-कश्मीरमध्ये डय़ुटी बजावणाऱ्या सर्व जवानांना आता बुलेटप्रूफ जॅकेट आणि हेल्मेट घालणे बंधनकारक असणार असून जवानांना डय़ुटीवर असताना मोबाईल वापरता येणार नाही. केवळ कमांडर आवश्यक सरकारी कामासाठी मोबाईलचा वापर करू शकतील, असे नवे निर्देश सीआरपीएफकडून जवानांच्या सुरक्षेसाठी जारी करण्यात आले आहेत.
कुलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सीआरपीएफने जवानांच्या सुरक्षेसाठी नवीन निर्देश जारी केले आहेत. 11 नोव्हेंबर रोजी कुलगाममध्ये झालेल्या हल्ल्यात तीन जवान जखमी झाले होते. जवानांना गोळीबारपासून वाचवण्यासाठी बुलेटप्रूफ सुरक्षा चौक्यांची व्यवस्था केली जाईल. संध्याकाळी आणि रात्री पुरेसा प्रकाश ठेवण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.

























































