
सामना ऑनलाईन, मुंबई
महाराष्ट्र विधान परिषदेच्या ११ सदस्यांचा कार्यकाळ येत्या २७ जून रोजी संपत असल्याने या रिक्त होणाऱ्याजागांसाठी येत्या १६ जुलै रोजी निवडणुका घेण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली.
विधान परिषदेचे सदस्य जयदेवराव गायकवाड, विजय गिरकर, माणिकराव ठाकरे, संजय दत्त, अनिल परब, नरेंद्र पाटील, अमरसिंह पंडित, शरद रणपिसे, सुनील तटकरे, महादेव जानकर आणि जयंत पाटील यांचा कार्यकाळ येत्या २७ जुलै रोजी पूर्ण होत आहे. त्या जागांसाठी निवडणुकीची अधिसूचना २८ जून रोजी काढली जाणार असून इच्छुक उमेदवार ५ जुलैपर्यंत नामांकन भरू शकणार आहेत. ९ जुलैपर्यंत उमेदवारी मागे घेता येईल. १६ जुलैला मतदान होईल आणि त्याच दिवशी सायंकाळी ५ नंतर मतमोजणी होईल असे आयोगाने कळवले आहे.



























































