
सामना ऑनलाईन । पिंपरी
राज्यभरात प्लास्टिकबंदी लागू केलेली असूनही लपूनछपून प्लास्टिक पिशव्या आणि अन्य उत्पादनं वापरली जात आहेत. बंदीचं उल्लंघन करून प्लास्टिक वापरणाऱ्यांवर पिंपरी-चिंचवड महापालिकेने ठिकठिकाणाहून प्लास्टिक जप्त करत पहिल्याच दिवशी तब्बल २ लाख ६० हजार रुपयांचा दंड गोळा केला आहे.
तर दुसरीकडे ठाण्यात ५०० किलोच्या प्लास्टिकच्या पिशव्या जप्त करण्यात आल्या असून अद्याप तीन जणांवर कारवाई करण्यात आली आहे. नाशिकमध्येही १२५ किलो प्लास्टिक जप्त करण्यात आलं आहे. नगर जिल्ह्यातही प्लास्टिक बंदीला जोरदार सुरुवात झाली असून आज महानगर पालिकेला तीन ठिकाणी कारवाई करून प्रत्येकी पाच हजार रुपये दंड वसूल केला आहे. सुट्टीच्या दिवशी ही कारवाई प्रशासनाने सुरू केली आहे प्लास्टिक बंदीने सर्वत्र दणका बसला आहे. नगर शहरामध्ये सकाळपासूनच धडक कारवाई सुरू केली आहे.























































