बॉक्स ऑफिसवर हिट झालेला ‘संजू’ इंटरनेटवर ‘लीक’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

रणबीर कपूर अभिनित संजू हा चित्रपट बॉक्सऑफिसवर तुफान गल्ला जमवताना दिसतोय. पण, बॉलिवूडला असलेल्या पायरसीच्या शापाची लागण संजूलाही झाली असून इंटरनेटवर संजू लीक झाला आहे.

sanju-leaked

अभिनेता संजय दत्त याच्या आयुष्यावर बेतलेला हा चित्रपट आजवरचा सर्वोत्तम बायोपिक असल्याची प्रतिक्रिया प्रेक्षकांसह समीक्षकांनीही दिली आहे. दिग्दर्शनातल्या त्रुटी वगळता रणबीर कपूरने संजय दत्त ही व्यक्तिरेखा पडद्यावर जिवंत केली आहे. त्यामुळे संजू या चित्रपटाकडे अनेकांचं लक्ष लागलं होतं.

यापूर्वी प्रदर्शित झालेले वीरे दि वेडिंग, परमाणू हे चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीला उतरले असले तरीही रेस-३ सारख्या बहुप्रतिक्षित चित्रपटाने प्रेक्षकांची निराशा केली होती. त्यामुळे संजू बॉक्सऑफिसवर चालतो का, हाही प्रश्न निर्मात्यांना होता. मात्र, आता चांगली कमाई करणारा संजू इंटरनेटवर लीक झाल्यामुळे निर्मात्यांचे धाबे दणाणले आहेत.