
सामना प्रतिनिधी।धामनगाव
जळकोट येथील मातंग तरुण बालाजी काशिनाथ तोगरे यांच्याविरुद्ध ग्रामसेवक सी. जी. बिडवई यांनी आय. पी. सी. ३५३ चा खोटा गुन्हा दाखल केला आहे. तो खोटा गुन्हा तात्काळ मागे घेण्यात यावा, बालाजी तोगरे यांच्या फिर्यादी प्रमाणे ग्रामसेवक व त्यांच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करावा तसेच ग्रामसेवकाच्या कारभाराची चौकशी करावी, या मागणीसाठी जळकोटच्या तहसील कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
बालाजी गुडसुरे, मारोती गुंडिले, बालाजी तोगरे यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालय, जळकोट समोर हे बेमुदत धरणे आंदोलन चालू करण्यात आले आहे. न्याय मिळेपर्यंत आंदोलन चालूच राहाणार आहे, तात्काळ न्याय नाही मिळाल्यास लातूर जिल्ह्य़ात सर्वच तालुका पातळीवर तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.
























































