डेल पोट्रो – नदाल आमने सामने

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । लंडन

युआन मार्टिन डेल पोट्रो याने मंगळवारी फ्रान्सच्या गिल्स सिमॉनला ७-६, ७-६, ५-७, ७-६ अशा फरकाने पराभूत करीत विम्बल्डन टेनिस ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेतील पुरुषांच्या गटात उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. आता त्याच्यासमोर स्पेनचा स्टार खेळाडू रफाएल नदालचे आव्हान असणार आहे. २०१३ सालानंतर युआन मार्टिन-डेल पोट्रो याला विम्बल्डन टेनिस ग्रॅण्डस्लॅमच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करता आलाय हे विशेष.

सेरेना, ओस्तापेन्कोची उपांत्य फेरीत धडक

येलेना ओस्तापेन्को हिने मंगळवारी महिला एकेरीच्या लढतीत डोमिनिका सिबुलकोवाला ७-५, ६-४ अशा फरकाने पराभूत करीत उपांत्य फेरीत प्रवेश केला. विम्बल्डनच्या उपांत्य फेरीत प्रवेश करणारी लॅटवियाची ती पहिलीच टेनिस खेळाडू ठरलीय. दरम्यान, अँजेलिक कर्बर, सेरेना विल्यम्स आणि ज्युलिया जॉर्जेस यांनीही प्रतिस्पर्ध्यांना हरवत अंतिम चारमध्ये एण्ट्री मारली.