शाळेच्या बसखाली येऊन ३ वर्षांच्या मुलाचा मृत्यू, उमरेडमध्ये तणाव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधीक फोटो

सामना ऑनलाईन, नागपूर

नागपूरमधील उमरेड भागामध्ये नर्सरीत शिकणाऱ्या मुलाचा मृत्यू झाला आहे. उमरेडमधल्या अकोला भागात स्कूलबबसच्या खाली आल्याने अमोघ राघोर्ते याचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर संतप्त जमावाने बस फोडून टाकली आहे, आणि या परिसरात सध्या तणावाचं वातावरण आहे. बसमधून उतरत असताना अमोघ मागच्या चाकाखाली आला ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला आहे.