३० फूट उंचीच्या झाडाची कत्तल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनीधी । पुणे

 टिळक रस्त्यावरील भरवर्दळीच्या गिरिजा हॉटेलजवळील ‘विश्वनाथ पान स्टॉल’शेजारी असणारे ३० ते ३५ फूट उंचीचे झाड अज्ञातांनी दोन-तीन दिवसांपूर्वी अर्धवट तोडून ठेवले. आज पहाटे संपूर्ण झाड तोडून टाकले.

कोणीतरी होर्डिंग्ज किंवा स्टॉल टाकण्याच्या हेतूने हे झाड तोडले असल्याचा संशय आहे. माजी खासदार आणि ज्येष्ठ नेते संभाजीराव काकडे यांच्या घराला लागून हे झाड होते. दोन-तीन दिवसांपूर्वी रात्रीच्या वेळी या झाडाच्या फांद्या आणि पानांची कत्तल करण्यात आली होती. त्याच वेळी बुंध्याशी अर्धे खोड तोडले होते, तरी झाड जिवंत होते. आज पहाटे अज्ञातांनी ते पूर्णपणे तोडले.

टिळक रस्त्यावरील या वर्दळीच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे असून, त्यामध्ये झाडाची कत्तल करणारे लोक सापडण्याची शक्यता आहे. स्थानिक नागरिकांनी याप्रकरणी उद्यान विभागाकडे तक्रार केली आहे.