
सामना प्रतिनिधी, रत्नागिरी
शिवसेना युवासेनेच्या वतीने बाळासाहेब ठाकरे आयएएस अकॅडमी अंतर्गत घेण्यात येणाऱ्या युपीएससीव एमपीएससी परीक्षेचे आज गोगटे कॉलेज येथे शुभारंभ झाला. शिवसेना उपनेते, आ.उदय सामंत यांनी सर्व परीक्षार्थींना शुभेच्छांची दिल्या.यावेळी एमपीएससीच्या पी.एस.आय. परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या रिझवाना ककेरी हिचा सत्कार सामंत यांच्या हस्ते करण्यात आला.

त्याप्रसंगी जिल्हा सह संपर्क प्रमुख राजेंद्र महाडिक,अॅड.राजशेखर मलुष्टे, महिला जिल्हा संघटक शिल्पाताई सुर्वे, युवासेना जिल्हा युवाधिकारी सुजित कीर,तालुका संघटक कांचन नागवेकर, शहरप्रमुख बिपिन बंदरकर,युवासेना तालुका युवाधिकारी तुषार साळवी, महिला शहर संघटक सौ.मनिषाताई बामणे,युवासेना शहर युवाधिकारी अभिजित दुडे, उपशहर प्रमुख प्रशांत साळुंखे, महिला उपशहर संघटक सुहासिनी भोळे, नगसेविका दया चवंडे, शिवसैनिक प्रशांत सुर्वे,बावा नाचणकर,युवासेना विभाग युवाधिकारी रोहित मायनाक, अनिकेत घडशी, अफाक मुकादम, लोभस देसाई, रुपेश चव्हाण, यांच्या सह सर्व विद्यार्थी, शिवसैनिक व युवासैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




























































