स्वामी अग्निवेश यांना कपडे फाटेस्तोवर चोपले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

गोमांस खाल्ले पाहिजे असा सल्ला देणारे वादग्रस्त स्वामी अग्निवेश यांना भाजयुमो आणि विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी आज अंगावरचे कपडे फाटेस्तोवर बेदम चोप दिला. डोंगरी भागातील महामेळाव्यासाठी अग्निवेश झारखंडमधील पाकूर येथे गेले होते. कार्यकर्त्यांनी त्यांच्या दौऱ्याला विरोध करत निदर्शने केली. तेव्हा झटापटीत अग्निवेश यांना जमावाच्या रोषाचा सामना करावा लागला. दरम्यान, पोलिसांनी हल्लेखोरांतील २० जणांना ताब्यात घेतले आहे.

उलटसुलट वक्तव्ये करून स्वामी अग्निवेश यांनी कायम वाद ओढवून घेतलेला आहे. त्यातच गोमांस खाल्ले पाहिजे असा सल्ला त्यांनी दिला होता. त्यामुळे संतप्त भाजयुमो व अ.भा. विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या पाकूर दौऱ्याला विरोध केला होता. मोठय़ा संख्येने जमलेल्या कार्यकर्त्यांनी स्वामी अग्निवेश हॉटेल मुस्कानमधून बाहेर येताच हल्लाबोल केला. ‘स्वामी वापस जाव’च्या जोरदार घोषणा देत कार्यकर्त्यांनी त्यांना बेदम मारहाण केली. यात त्यांच्या अंगावरील कपडेही फाटले. या घटनेनंतर कार्यकर्त्यांनी हॉटेलसमोरच धरणे आंदोलन केले.

स्वामी अग्निवेश यांना झालेल्या मारहाणीच्या घटनेची चौकशी करण्याचे आदेश झारखंडचे मुख्यमंत्री रघुवर दास यांनी दिले आहेत. गृह खात्याच्या सचिवांना हे आदेश देण्यात आले असून संथालचे आयुक्त आणि डीआयजी या प्रकरणाचा तपास करतील.