या जबरदस्त धक्क्याने बदललं स्मिता गोंदकरचं संपूर्ण आयुष्य

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

बिग बॉस मराठीचा फिनाले अगदी दोन दिवसांवर येऊन ठेपलेला आहे. आस्ताद काळे, स्मिता गोंदकर, मेघा धाडे, सई लोकूर, पुष्कर जोग आणि शर्मिष्ठा राऊत हे सहा जण फायनलमध्ये पोहोचले आहेत. या फायनलिस्टमध्ये स्मिता गोंदकर देखील विजेतीपदाची भक्कम दावेदार मानली जात आहे. घरातील एक ग्लॅमरस व्यक्तिमत्त्व असलेल्या स्मिताने तिच्या साध्या सरळ स्वभावाने स्पर्धकांसोबतच प्रेक्षकांची देखील मने जिंकली आहेत. नेहमी आनंदी राहणाऱ्या स्मिताच्या आयुष्यात एकेकाळी असे वादळ आले होते की, त्यामुळे तिच्या संपूर्ण आयुष्यालाच कलाटणी मिळाली होती. स्मिताने ज्या व्यक्तीसोबत लग्न केल्याचा दावा केला होता, त्या व्यक्तीने त्यांचे लग्न म्हणजे सिनेमातला एक सीन असल्याचा दावा करत स्मिताला झिडकारले होते.

smita-gondkar

स्मिताने एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीनुसार, स्मिताचे जुलै २०११ मध्ये माजी नगरसेवक सिद्धार्थ बाठियासोबत लग्न झाले होते. काही महिने व्यवस्थित गेल्यानंतर स्मिताला एका महिलेचा फोन आला व तिने ती सिद्धार्थची पहिली पत्नी असल्याचा दावा केला होता. याविषयी तिने सिद्धार्थला विचारले असता त्याने त्याचे लग्न झाल्याचे मान्य केले, मात्र त्याचा घटस्फोट झाल्याचे त्याने सांगितले. त्याने घटस्फोटाची खोटी कागदपत्रे तसेच स्मिता व त्याच्या लग्नाचा दाखला देखील त्याने तिला दाखवला. स्मितासाठी हा धक्का असला तरी सिद्धार्थवरील प्रेमासाठी तिने मान्य केलं.

मात्र काही महिन्यांनंतर ती बाई स्मिताच्या घरी येऊन धडकली व तिने ती सिद्धार्थची बायको असून त्यांचा घटस्फोट झाल्याचे सांगितले. तसेच सिद्धार्थ व त्याच्या पहिल्या पत्नीला दोन मुलं देखील असल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर स्मिताच्या पायाखालची जमीन सरकली व तिने सिद्धार्थच्याविरोधात पोलिसात तक्रार केली. मात्र सिद्धार्थने स्मिताला दिलेला लग्नाचा दाखला देखील खोटा होता. या प्रकरणी पोलिसांनी सिद्धार्थची चौकशी केली असता त्याने स्मितासोबत लग्न न झाल्याचा दावा केला होता. स्मिताने दाखवलेले लग्नाचे फोटो एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान काढल्याचे त्याने म्हटले होते. एका शूटिंगदरम्यान सेटवर अभिनेता न आल्याने लग्नाच्या शूटिंगसाठी तो स्मिताचा नवरा बनला होता. याप्रकरणी स्मिताने पुण्यातील कौटुंबिक न्यायालयात फसवणूक करून लग्न केल्याचा, बलात्काराचा तसेच पैशांची फसवणूक केल्याचा खटला दाखल केला होता. सिद्धार्थने शासकीय कोट्यातून घर मिळवून देतो म्हणून स्मिताकडून ११ लाख रुपये उकळल्याचा आरोप देखील तिने केला आहे.

२००७ मध्ये ‘मुंबईचा डबेवाला’ या चित्रपटातून स्मिताने मराठी इंडस्ट्रीत पाऊल ठेवले होते. स्मिता एक प्रोफेशनल स्टंट बायकर असून २००९ च्या एमटीव्ही स्टंट मॅनिया या शोमध्ये ती अंतिम फेरीत पोहोचली होती. हिप हिप हुर्रे, बायको नंबर वन, भय हे तिचे गाजलेले मराठी चित्रपट आहेत.