सुधीर फडके यांच्या जन्मशताब्दीनिमित्त प्रभादेवीत कार्यक्रम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई

विख्यात संगीतकार आणि गायक सुधीर फडके उर्फ बाबूजी यांचे विचार रसिकांसमोर उलगडणार आहेत. सुधीर फडके यांच्या जन्मशताब्दीनिमित्त प्रभादेवीत सोहळा आयोजित करण्यात आला आहे. २५ जुलै रोजी रवींद्र नाट्यमंदिर येथे हा सोहळा होणार असून या कार्यक्रमाला अतिथी म्हणून राजकिय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

जीवनगाणी तसेच स्व सुधीर फडके यांच्या परीवाराच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सायंकाळी ७.३०वाजता हा कार्यक्रम होणार असून बाबुजींबद्दल त्यांचे विचार व अनुभव ऐकायला मिळणार आहेत. याकार्यक्रमाला सरसंघचालक मोहन भागवत, उत्तरप्रदेशचे राज्यपाल राम नाईक, नागालँडचे राज्यपाल पद्मनाभ आचार्य, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षणमंत्री विनोद तावडे, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, गायक सुरेश वाडकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.