पुण्यात मोठी कारवाई, तीन टन गोमांस पकडले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ब्रिजमोहन पाटील । पुणे

ऐन आषाढी एकादशीच्या दिवशीच नगरवरून नवी मुंबई येथे विक्रीसाठी नेले जात असलेले तब्बल तीन टन गोमांस गोरक्षकांची पकडल्याची घटना मुंढवा येथे घडली. याप्रकरणी मुंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. गायी कापणारा तौफिक कुरेशी, सद्दाम शेख, गोमांस विकत घेणारी अलना कंपनी, चालक अल्लाउद्दीन शहाबुद्दीन कमलापूर, क्लिनर अब्दुल मूनाफ अब्दुल हमीद कुरेशी यासह गाडी मालकावर महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा सुधारित १९९५ चे कलम ५ (क ), ९ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. मानद पशुकल्याण अधिकारी शिवशंकर स्वामी यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे.

नगर येथील झेंडिगेट कसाई मोहल्ल्यातून गाय आणि बैलाचे मांस आयशर टेम्पोमधून नवी मुंबईला घेऊन जात असल्याची माहिती गोरक्षकांना मिळाली. त्यानुसार शिवशंकर स्वाीम आणि इतर गारक्षकांनी मुंढवा चौकात पोलिसांच्या मदतीने सापळा रचला. हा टेम्पो चौकात येताच तो अडविण्यात आला. चालकाकडे चौकशी केली असता, तौफिक कुरेशी आणि सद्दाम शेख यांनी हे गोवंशाचे मांस नवी मुंबईतील येथील अलना कंपनीत घेऊन जाण्यास सांगितले आहे असे टेम्पो चालकाने सांगितले. पोलिसांच्या समोर पशुवैधकीय अधिकारी डॉ. दिवेकर आणि मानद पशुकल्याण अधिकारी शिवशंकर स्वामी यांनी टेम्पोची पहाणी केली असता त्यात गायी व बैलांचे मुंडकी, मांस, पाय दिसले असे सुमारे सात लाख रूपये किंमतीचे तीन टन गोवंश दिसले. मुंढवा पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहकार्य करून त्वरीत गुन्हा दाखल केला. समस्त हिंदू आघाडी गोरक्षण विभागाचे कार्यकर्ते सचिन शिंदे, उपेंद्र बलकवडे, सचिन जवळगे, सनी येळवंडे, रमेश कोळी, प्रतीक गायकवाड, कृष्णा सातपुते, अक्षय घोरपडे, श्रीकांत कोळी, विशाल गडदे, कुणाल शिंदे, ओंकार इंगुलकर, भैया भोकरे, सौरभ रुईकर यांनी यामध्ये सहकार्य केले.