दिवा पॅसेंजर मधून पडून तरूण गंभीर जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । संगमेश्वर

कोकण रेल्वेच्या दिवा पॅसेंजर मधून रत्नागिरीला जाणारा युवक धामणी नजीक रेल्वेतुन पडून गंभीर जखमी झाला आहे. प्रेमसिंग दूरावे (२३, जबलपूर मध्यप्रदेश ) असे या युवकाचे नाव आहे. ही घटना मंगळवारी दुपारी २ च्या सुमारास घडली. दिवा पॅसेंजर मधून तो रत्नागिरीला जात होता.

दुपारी गाडी धामणी जवळील बोगद्यात आली असता तो अचानक खाली पडला. ट्रॅकमनने याची खबर रेल्वे स्टेशन मास्तरना दिली. त्यांनी ग्रामीण रुग्णालयात फोन  करून याची माहिती दिली. तत्काळ १०८ रुग्णवाहिका घेऊन चालक काशिनाथ फेपडे, वैद्यकीय अधिकारी डॉ शहाजी मोटे,  नायरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ आशिष ठिगळे यांनी दीड किमी चालत जाऊन युवकाला  बोगद्यातून हायवे पर्यंत उचलून आणले.  रुग्णवाहिकेत घेऊन ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात दाखल केले.