आशियाई स्पर्धेत चमका, राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार मिळवा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

आशियाई क्रीडा स्पर्धा पुढल्या महिन्यात होणार असून या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत पदकांची कमाई करणाऱ्या खेळाडूंना हिंदुस्थानातील मानाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळवता येणार आहे. केंद्रीय क्रीडा मंत्रालयाकडून याबाबतचा विचार सुरू आहें. तसेच हा पुरस्कार सोहळा दरवर्षी मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिवशी अर्थातच २९ ऑगस्ट रोजी घेण्यात येतो, पण आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अडथळ्यामुळे यंदा हा सोहळा २५ सप्टेंबरला आयोजित करण्यात येणार आहे.

आशियाई क्रीडा स्पर्धा १८ ऑगस्ट ते दोन सप्टेंबर या कालावधीत होणार आहे. त्यामुळे २९ ऑगस्ट रोजी खेळाडू, कोचेस आणि अधिकारी मोठय़ा संख्येने उपस्थित राहू शकत नाहीत. याच कारणास्तव केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने २९ ऑगस्टऐवजी २५ सप्टेंबरला राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार घेण्यात यावे यासाठी विनंती करण्यात आली होती.