
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
कर भरताना येणार्या कायदेशीर, तांत्रिक आणि तत्कालीन अडचणी लक्षात घेऊन केंद्र सरकारने आयकर परतावा भरण्याची मुदत एक महिन्याने वाढवली आहे. २०१८-२०१९ या आर्थिक वर्षाचा आयकर परतावा आता ३१ जुलैऐवजी ३१ ऑगस्ट २०१८ पर्यंत भरता येणार आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) ही मुदत वाढवली आहे, मात्र व्यक्तिगत करभरणा करणार्या व्यक्ती आणि आस्थापनांनी (ज्यांना ऑडिटची आवश्यकता नाही) ३१ जुलैपर्यंतच आयकर परतावा भरला पाहिजे. त्यांना मुदतवाढ देण्यात आलेली नाही.
- ३१ ऑगस्टनंतर पाच लाखांच्या आत उत्पन्न असणार्या करदात्याला जास्तीत जास्त एक हजाराचा दंड भरावा लागेल.
- ३१ डिसेंबर २०१८च्या आधी टॅक्स भरला तर पाच हजार आणि ३१ डिसेंबर २०१८ नंतर कर भरणार्यांना दहा हजार रुपये दंड भरावा लागेल.























































