आजही मराठा मोर्चाचे आंदोलन सुरू, आमदूरा येथे पोलीस बंदोबस्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नांदेड

मराठा मोर्चाची आंदोलन अद्यापही सुरू असून काही भागांमध्ये अद्यापही बंद आहे. शुक्रवारी आमदूरा व पुणेगाव जिल्हा नांदेड येथे आज मराठा समाजाचे वतीने गोदावरी नदीकिनारी आंदोलन करण्यात आले. त्यासाठी उपाय म्हणून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दोन्ही गावात १०० ते २०० जनसमुदाय हजर असल्याची माहिती.

मराठा आरक्षणासाठी नायगांव तालुक्यात आज जलसमाधी आंदोलन करण्यात आले. राहेर येथे राज्य राखीव दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या. गोदावरी नदी पात्रावर आंदोलकांना रोखण्यासाठी बेरीकेट्सचा वापरण्यात आले होते. रात्री अतिरिक्त पोलीस अधिक्षकांनी भेट दिली. काही ठिकाणी बोटींसह प्रशासन सज्ज होते. तसेच कारेगाव फाटा मार्गावर दुगाव पाटी व कारेगाव फाटा येथूनच वाहतूक थांबवण्यात आली.