मराठा आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल करू नका – सर्वपक्षीय नेत्यांची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विजय जोशी । जालना

महाराष्ट्रात मराठा समाजाला शैक्षणिक व नोकरीमध्ये आरक्षण मिळण्यासाठी मोर्चा व शांततेच्या मार्गाने गेल्या ८ दिवसांपासून मराठा समाजाने आपल्या भावना सरकार समोर प्रदर्शित केल्या आहेत.
आंदोलनातील सर्व आंदोलनकर्ते होतकरू, तरुण व बेरोजगारीने ग्रासलेले आहेत. त्यांच्या भविष्याचा विचार करता या आंदोलनकर्त्यांवर कोणत्याही कलमाखाली गुन्हे दाखल करण्यात येऊ नये, अशी मागणी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

दरम्यान पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे यांच्याकडे सर्वपक्षीय निवेदन देण्यात आले. आमदार राजेश टोपे, भाजपचे विलास खरात यांनी संयुक्तरीत्या पोलीस अधीक्षक यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी जि.प. अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, मोर्चा समन्वयक जगन्नाथ पाटील, तात्यासाहेब चिमणे, बाळासाहेब जाधव, देवनाथराव जाधव, शंतनू देशमुख, कल्याण सपाटे, रामेश्वर गरड, संभाजी देशमुख, अंकुशराव बोबडे, राज देशमुख, बाळासाहेब तांगडे, नीलेश गोर्डे, धर्मराज शिंदे, सुशील तांगडे, गणेश कोरडे, रमेशराव बोबडे आदी होते.