
सामना प्रतिनिधी । संगमेश्वर
मुंबई – गोवा महामार्गाची सध्या दुरावस्था झाली असून अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत या खड्ड्यांच्या पार्श्वभुमीवर संतोष येडगे यांनी शुक्रवार दि. २७ जुलै रोजी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे मुख्य अभियंता विनय देशपांडे यांची भेट घेत चर्चा केली महामार्गप्रकरणी लक्ष देवून गणेशोत्सवापुर्वी महामार्ग खड्डेमुक्त करण्याची विनंती केली असता गणेशोत्सवापुर्वी मुंबई – गोवा महामार्ग खड्डेमुक्त करण्यात येईल तशा सुचना अधिक्षक अभियंता , कार्यकारी अभियंता व संबंधीत ठेकेदारांना दिल्या आहेत त्याप्रमाणे कार्यवाही सुरु असून पावसाचे प्रमाण कमी झाल्यास सर्वच खड्डे डांबराने भरणार असल्याची माहीती यावेळी मुख्य अभियंता विनय देशपांडे यांनी दिली.
रत्नागिरी जिल्ह्याच्या हद्दीतील कशेडी ते राजापुर दरम्यान कमी अधिक प्रमाणात महामार्गाचे काम करण्यात आले आहे रस्त्याच्या चौपदरीकरण कामामुळे अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत महामार्गावरील खड्डे पावसाळपुर्वी भरण्याच्या सुचना करण्यात आल्या होत्या काही तांत्रिक कारणांमुळे खड्डे भरण्याचे काम रखडले मात्र आता यापुढे महामार्गावरील खड्ड्यांप्रकरणी ठेकेदारांची गय केली जाणार नसल्याची माहीती मुख्य अभियंत्यांनी दिली.
पावसाचे प्रमाण अधिक असल्यामुळे महामार्गावरील खड्डे भरण्यासाठी डांबर वापरणे शक्य नाही तरीही पाउस कमी झाल्यास सर्वच खड्डे डांबराने भरले जातील महामार्गावरील प्रवाशांना त्रास होणार नाही याची दक्षता संबंधीत ठेकेदारांनी घ्यावी व प्रवाशांच्या सुरक्षीततेप्रकरणी महामार्गावर ठिकठिकाणी सुचना फलक लावावेत अशा सुचना ही केल्याची माहीती देशपांडे यांनी दिली.
मुंबई – गोवा महामार्ग चौपदरीकरण कामाची गती चांगली असून डिसेंबर २०१९ पर्यंत काम पुर्ण होईल असा विश्वास यावेळी मुख्य अभियंत्यांनी व्यक्त केला चौपदरीकरण प्रकल्पातील काही तांत्रिक अडचणी सोडवून चौपदीकरण काम करावे लागत असल्याने अडथळा ठरु पाहणा-या अडचणी सुटतील आणि २०१९ ला चौपदीकरण काम पुर्ण होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

































































