ट्रेंड – आजींचा भन्नाट डान्स

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सोशल मीडियावर सध्या एका आजींच्या डान्सने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. या आजींनी ‘जब जिद पे आ गई पार्वती’ या गाण्यावर असा काही ठेका धरला आहे की, तो डान्स पाहून नेटकरी मोहित झाले. टीव्हीवर गाणं सुरू होताच त्या हातांच्या वेगवेगळ्या हालचाली करत ताल धरताना दिसतात. त्यांच्या चेहऱ्यावरचा निरागस आनंद, गाण्याचा ठेका आणि उत्साह पाहून नेटकऱ्यानी त्यांचे कौतुक केले आहे. हा व्हिडीओ @pushpagujarathi या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून पोस्ट करण्यात आला असून त्याला आतापर्यंत लाखो लाईक्स आणि कमेंट्स मिळाल्या आहेत.