मेट्रोचा गिरगावात पहिला हातोडा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
छायाचित्र सौजन्य :  सचिन वैद्य

सामना ऑनलाईन । मुंबई

दक्षिण मुंबईत मेट्रोच्या कामाने वेग धरला आहे. मेट्रोच्या कामात अडसर ठरणार्‍या अनेक इमारती जमीनदोस्त करण्यात येणार आहेत. शनिवारी गिरगाव-ठाकूरद्वार येथील ३३०, विठ्ठलदास इमारतीवर मेट्रोचा पहिला हातोडा पडला. गेल्या कित्येक पिढय़ा गिरगावच्या याच चाळींमध्ये घालवलेल्या आणि आयुष्यातील सुख-दु:खे शेजार्‍यापाजार्‍यांशी वाटून घेतानाचे अनेक प्रसंग पाहिलेल्या या इमारतीच्या भिंती आता या ठिकाणी दिसणार नाहीत. इथे दिसेल ते हायफाय मेट्रोचे स्टेशन. इमारत तोडण्याचे काम आतून सुरू करण्यात आले असून लवकरच ही इमारत भुईसपाट करून मेट्रोच्या कामाचा आवाका वाढविण्यात येणार आहे.